तुम्हांला मूल नको आहे म्हणजे तुम्हांला करिअर हवंच आहे असं नाही
मॅरिएन एलोइस
०८ जुलै २०२०
२६ वर्षांची होईपर्यंत ‘आयुष्यात काहीही करायचं नाही’, असा विचार मी कधीही केला नव्हता. माझं वय लहान असल्यापासून आपल्याला मूल नको आहे हे मला माहीत होतं. त्यामुळे मुलांच्या ऐवजी मी एमएची पदवी आणि माझ्या करिअरमागे धावत राहिले. माझ्यासाठी केवळ तेवढेच पर्याय आहेत असं मला वाटत होतं, मात्र एका टप्प्यावर मला ते जगणं फार आवडू लागलं - पोटापुरता पैसा कमवायचा, त्यासाठी काम करायचं, माझ्या जवळच्या माणसांसोबत वेळ …